आपले सहर्ष स्वागत आहे.
सांगवडेवाडी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात वसलेले एक शांत, सुसंस्कृत व प्रगतशील गाव आहे.
कोल्हापूर शहराच्या जवळ असल्यामुळे ग्रामीण जीवनशैलीसोबतच आधुनिक सुविधांचा समन्वय येथे पाहायला मिळतो. शेती, कष्टकरी वृत्ती आणि सामाजिक ऐक्य ही या गावाची ओळख आहे.
गावातील नागरिक शिक्षण, व्यवसाय, नोकरी व शेती अशा विविध क्षेत्रांत सक्रिय असून गावाच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेतात.
सांगवडेवाडी ग्रामपंचायत ही गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रमुख आधारस्तंभ आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे.
ग्रामसभा, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जातो.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत